लायन्स क्लबच्या होणाऱ्या इन्स्टॉलेशन कार्यक्रमाचे प्रमुख माननीय PMJF La.संजीव गांधी (सुरत) यांनी आज आपल्या लायन्स क्लब नंदुरबारच्या विविध प्रोजेक्टला भेट दिली. सोबत PST टीम व जेष्ठ लायन्स सदस्य मान्यवर उपस्थित होते. आपले सगळे प्रोजेक्ट बघून संजीव गांधी सरांनी समाधान व्यक्त केले आणि आपल्या लायन्स क्लबचे तोंड भरून कौतुक केले. दोन्ही अन्नदान प्रकल्पांबद्दल विशेष कौतुक केले. या भेटीदरम्यान लायन्स क्लब नंदुरबार तर्फे रावेन्ना येणारे प्रकल्पांना भेटी देताना त्यात कन्यादान मंगल कार्यालयाच्या मागच्या बाजूस असलेल्या लायन्स चिल्ड्रन पार्क येथे वृक्षरोपण,सिव्हिल हॉस्पिटल येथे गेल्या दहा-बारा वर्षांपासून सुरू असलेला अन्नपूर्णा दररोज खिचडी वाटप प्रकल्प, स्पाईन फाउंडेशन व लायन्स क्लब यांच्या सहकार्याने सिव्हिल हॉस्पिटल येथे अज्ञायावत ऑपरेशन थेटर ला भेट, छत्रपती शिवाजी नाट्य मंदिराजवळील चौकात लायन्स चौक भेट, नगरपालिका व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने निराधार भवन येथील निराधार लोकांसाठी सकाळ संध्याकाळ दररोज अन्नछत्रालय चालवलं जातं त्या निराधार भावनाला भेट.