• District 3234H2

    One for All All for One

District Events

लायन्स गरबा दांडिया उत्सव धुळे

11 Oct 2026

*लायन्स क्लब धुळे आयोजित १० दिवसीय भव्य गरबा दांडिया उत्सव २०२६ ची दिमाखदार सांगता ; धुळेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद* *धुळे :* लायन्स क्लब धुळे आयोजित आणि संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेणाऱ्या भव्य "गरबा दांडिया उत्सव २०२६ - थिरका तालावर, जपा परंपरा!" या १० दिवसीय महोत्सवाची काल दिमाखदार सांगता झाली. लायन्स गरबा ग्राउंड, अग्रसेन पुतळ्याजवळ, मालेगाव रोड येथे आयोजित या उत्सवाला धुळेकरांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. पारंपारिक वेशभूषा, आकर्षक रोषणाई, उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आणि सुरक्षित व्यवस्थेमुळे दररोज हजारो गरबा रसिकांनी, विशेषतः महिला आणि युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या उत्सवाच्या यशस्वीतेमागे लायन्स क्लबच्या सदस्यांची एकजूट आणि नियोजन होते. या प्रसंगी क्लबचे मार्गदर्शक माजी प्रांतपाल लायन नितीन जी बंग, अध्यक्ष लायन तुषार आढावे, सेक्रेटरी लायन मयूर जैन, खजिनदार लायन संदीप जैन यांनी सर्वांचे आभार मानले. या उत्सवाला यशस्वी करण्यासाठी लायन जितू काका शहा, लायन चेतन बार्डिया, लायन पुष्पक ओस्तवाल, लायन वर्धमान जैन, लायन श्रीहरी अहिरे, लायन अश्विन भाऊ, लायन विलास येवला, लायन हर्षल अग्रवाल, लायन केयुर शहा, लायन निरज शहा, लायन चेतन अग्रवाल, डॉ. अल्पेश पिंगळे, लायन सुनील कानुगो, लायन अविनाश पाटील, लायन चारुल सुराणा, लायन निलेश लोढा, लायन जयेश जैन, लायन प्रसाद मुंदडा, लायन कृष्णा मांडे, लायन नितीन अग्रवाल, लायन नितीन गवळी, पूजा कानुगो, सोनल बार्डिया, सोनाली लोखंडे, सोनाली अढावे, हितांशी शहा, डॉ. अश्विनी जैन, अंकिता मांडे, निकिता शहा यांनी विशेष परिश्रम घेतले. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी विविध स्पर्धांमधील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.