🦁 लायन्स क्लब धुळे 🦁 📅 दिनांक – ११ ऑक्टोबर २०२६, रविवार 🌟 लायन खिचडी घर 🌟 कायमस्वरूपी सेवाप्रकल्प (Permanent Service Project) “सेवा हीच साधना, माणुसकी हाच धर्म आणि अन्नदान हेच श्रेष्ठ दान!” लायन्स क्लब धुळेचा ‘लायन खिचडी घर’ हा महत्त्वपूर्ण कायमस्वरूपी सेवाप्रकल्प गेल्या पाच वर्षांहून अधिक काळापासून सिव्हिल हॉस्पिटल, साक्री रोड बायपास, धुळे येथे अविरतपणे सुरू आहे. दररोज सायंकाळी ६:३० वाजता गरमागरम खिचडीचे ७० ते ७५ पॅकेट्स रुग्णांना भेटण्यासाठी आलेल्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला तसेच ग्रामीण भागातून आलेल्या गरजू व्यक्तींना प्रेमपूर्वक वितरित केले जातात. या प्रकल्पाचा उद्देश प्रसिद्धी नसून निःस्वार्थ सेवा हा आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना कठीण प्रसंगी अन्नाचा आधार मिळावा, गरजूंची भूक भागावी आणि त्यांच्या मनात आपुलकीची भावना निर्माण व्हावी, हाच आमचा प्रामाणिक ध्यास आहे. 🦁 पी.एस.टी. टीम २०२६–२७ 🔹 प्रोजेक्ट चेअरमन: MJF ला.केयूर शहा 🔹 अध्यक्ष: ला.तुषार अढावे 🔹 सेक्रेटरी: ला.मयूर जैन 🔹 खजिनदार: ला.संदीप जैन या सेवाकार्यात योगदान देणाऱ्या लायन्स क्लब धुळेच्या सर्व सन्माननीय सभासदांचे मनःपूर्वक आभार! 💐 “लायन खिचडी घर — भुकेल्याला अन्न, गरजूला आधार आणि सेवेतून माणुसकीचा सन्मान!” 🦁 WE SERVE — सेवेतून समाधान, सेवेतून समाजकल्याण!
| Benefited People | 75 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 0 |