• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

लायन खिचडी घर

05 Oct 2026

🦁 लायन खिचडी घर 🦁 लायन्स क्लब धुळेचा कायमस्वरूपी सेवाप्रकल्प दिनांक : ५ ऑक्टोबर २०२६,सोमवार लायन्स क्लब धुळेचा “लायन खिचडी घर” हा केवळ एक उपक्रम नसून, सेवा, माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीचे जिवंत उदाहरण आहे. गेल्या पाच वर्षांहून अधिक काळापासून सिव्हिल हॉस्पिटल, साक्री रोड बायपास, धुळे येथे हा कायमस्वरूपी सेवाप्रकल्प (Permanent Service Project) अविरतपणे सुरू आहे. दररोज सायंकाळी ६:३० वाजता गरमागरम खिचडीचे सुमारे ७० ते ७५ पॅकेट्स रुग्णांना भेटण्यासाठी आलेले नातेवाईक, मित्रपरिवार तसेच ग्रामीण भागातून उपचारासाठी आलेल्या गरजू व्यक्तींना प्रेमपूर्वक वितरित केले जातात. रुग्णालयात आपल्या प्रियजनांच्या उपचारासाठी आलेल्या कुटुंबीयांना अनेकदा मानसिक, आर्थिक आणि दैनंदिन अडचणींचा सामना करावा लागतो. अशा वेळी त्यांच्या मदतीला धावून जाणे, त्यांच्या भुकेची जाणीव ठेवणे आणि मायेचा एक घास देणे, हीच आमच्या सेवाभावाची खरी ओळख आहे. या प्रकल्पाचा उद्देश प्रसिद्धी मिळवणे नसून, गरजूंच्या चेहऱ्यावर समाधान आणणे हा आहे. “सेवा हीच खरी प्रसिद्धी” या भावनेतून आम्ही सातत्याने कार्यरत आहोत. समाजातील गरजू घटकांना आधार देणे आणि “We Serve” या लायन्सच्या मूलमंत्राला प्रत्यक्ष कृतीत उतरवणे, हेच लायन्स क्लब धुळेचे ध्येय आहे. पी.एस.टी. टीम २०२६–२७ प्रोजेक्ट चेअरमन: MJF ला. केयूर शहा अध्यक्ष: ला. तुषार अढावे सेक्रेटरी: ला. मयूर जैन खजिनदार: ला. संदीप जैन या सेवाकार्यात सातत्याने योगदान देणाऱ्या लायन्स क्लब धुळेच्या सर्व सन्माननीय सभासदांचे मनःपूर्वक आभार. “लायन खिचडी घर — भुकेल्याला अन्न, गरजूला आधार आणि समाजाला माणुसकीचा संदेश!” WE SERVE 🦁 सेवेतून समाधान… सेवेतून माणुसकी!

Benefited People 75
Raised Of Amount 0
Donated Of Amount 0