🌹 सेवेतून समाधान… माणुसकीतून नातं! 🌹 लायन्स क्लब धुळे यांच्या वतीने हिरे मेडिकल कॉलेज व सिव्हिल हॉस्पिटल,धुळे येथे उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना व मित्रपरिवाराला दररोज सायंकाळी ७:०० वाजता गरमा गरम खिचडीचे ७० पॅकेट प्रेमपूर्वक वितरीत करण्यात येतात. रुग्णालयात उपचार घेत असताना रुग्णांची काळजी घेणाऱ्या नातेवाईकांना अनेकदा वेळेवर जेवण मिळणेही कठीण होते. अशा वेळी त्यांच्या गरजेच्या क्षणी एक गरमागरम जेवणाचे पॅकेट देणे म्हणजे केवळ अन्नदान नव्हे, तर त्यांच्या कठीण काळात माणुसकीचा आधार देणे आहे. ही सेवा आजची किंवा उद्याची नाही… तर मागील तब्बल ५ वर्षांपासून निरंतर, नियमित आणि अविरतपणे सुरू आहे. कोणताही गाजावाजा न करता, केवळ “We Serve” या ब्रीदवाक्याला कृतीत उतरवत लायन्स क्लब धुळे आपल्या सेवाकार्यात सातत्याने योगदान देत आहे. दररोजचे ७० खिचडी पॅकेट, म्हणजे वर्षभरात हजारो गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचणारी ही सेवा… अनेकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य आणते आणि त्यांच्या मनात “आपण एकटे नाही” हा विश्वास निर्माण करते. सेवा हीच खरी संपत्ती… माणुसकी हीच खरी ओळख… आणि निरंतर सेवा हेच लायन्स क्लब धुळेचे खरे सामर्थ्य! ❤️ 🙏🏻 लायन्स क्लब धुळे - We Serve 🙏🏻 ला.तुषार अढावे - अध्यक्ष ला.मयूर जैन - सेक्रेटरी ला.संदिप जैन - खजिनदार
| Benefited People | 70 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 0 |