• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

लायन खिचडी घर

28 Oct 2026

🦁 लायन्स क्लब धुळे 🦁 📅 दिनांक – २८ ऑक्टोबर २०२६, बुधवार 🌟 लायन खिचडी घर 🌟 कायमस्वरूपी सेवाप्रकल्प (Permanent Service Project) “अन्नदान हेच श्रेष्ठ दान, सेवेतून माणुसकीचे जतन!” लायन्स क्लब धुळेचा ‘लायन खिचडी घर’ हा कायमस्वरूपी सेवाप्रकल्प गेल्या पाच वर्षांहून अधिक काळापासून सिव्हिल हॉस्पिटल, साक्री रोड बायपास, धुळे येथे अविरत सुरू आहे. दररोज सायंकाळी ६:३० वाजता गरमागरम खिचडीचे ७० ते ७५ पॅकेट्स रुग्णांचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामीण भागातून आलेल्या गरजू व्यक्तींना प्रेमपूर्वक वितरित केले जातात. प्रसिद्धी नव्हे, तर निःस्वार्थ सेवा हेच आमचे ध्येय! गरजूंची भूक भागवून त्यांच्या कठीण प्रसंगी आधार देणे, हाच या प्रकल्पामागील प्रामाणिक सेवाभाव आहे. 🦁 पी.एस.टी. टीम २०२६–२७ - प्रोजेक्ट चेअरमन: MJF ला. केयूर शहा - अध्यक्ष: ला. तुषार अढावे - सेक्रेटरी: ला. मयूर जैन - खजिनदार: ला. संदीप जैन या सेवाकार्यात योगदान देणाऱ्या सर्व सन्माननीय सभासदांचे मनःपूर्वक आभार! 💐 WE SERVE — सेवेतून समाधान, सेवेतून माणुसकी!

Benefited People 75
Raised Of Amount 0
Donated Of Amount 0