ईद-ए-मिलादीन निमित्त सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अन्नदान कार्यक्रम नंदुरबार, दि. 26 ऑगस्ट 2026 : ईद-ए-मिलादीन निमित्त सिव्हिल हॉस्पिटल येथे सामाजिक बांधिलकी जपत लायन्स क्लबच्या सहकार्याने लाईफ स्टार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमातून रुग्ण, त्यांच्या नातेवाईक तसेच हॉस्पिटलमधील गरजू व्यक्तींना अन्नाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास लाईफ स्टारचे अध्यक्ष खलील खाटीक उपाध्यक्ष आबिद रंगरेज, सचिव सईत सर, कोषाध्यक्ष नासिर बागवान, मसी सर, यांच्यासह जमाल खाटीक, आरिफ शेख, गुलाम रसूल खाटीक, जाकीर बागवान, नासिर बागवान, वसीम खान, खालील पठाण आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. ईद-ए-मिलादुननबी च्या पवित्र निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या अन्नदान उपक्रमातून सामाजिक एकोपा, मानवसेवा आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले. — लाईफ स्टार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था
| Benefited People | 350 |
| Raised Of Amount | 2500 |
| Donated Of Amount | 2500 |