• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

लायन खिचडी घर

07 Sep 2026

🦁 लायन खिचडी घर दि.७ सप्टेंबर २०२६ “सेवेतून समाधान… माणुसकीतून आपलेपणा!” लायन्स क्लब धुळेचा “लायन खिचडी घर” हा क्लबचा एक पर्मनंट सेवा प्रकल्प असून, गेल्या ५ वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. सिव्हिल हॉस्पिटल, साक्री रोड बायपास, धुळे येथे दररोज सायंकाळी ६:३० वाजता रुग्णांच्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला तसेच ग्रामीण भागातून उपचारासाठी आलेल्या गरजू व्यक्तींना गरमागरम खिचडीचे सुमारे ७० ते ८० पॅकेट्स प्रेमपूर्वक वितरित केले जातात. रुग्णालयात आलेल्या कुटुंबीयांसाठी हा उपक्रम केवळ अन्नवाटप नसून, त्यांच्या कठीण प्रसंगी दिलेला माणुसकीचा आधार, आपुलकीची ऊब आणि सेवाभावाचा हात आहे. या प्रकल्पाचा आमचा मुख्य उद्देश प्रसिद्धी नसून सेवा हा आहे. कोणतेही श्रेय किंवा अपेक्षा न ठेवता गरजूंच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटवणे आणि त्यांच्या अडचणीच्या काळात शक्य तितकी मदत करणे, हाच आमचा खरा ध्यास आहे. 🤝 “ONE FOR ALL, ALL FOR ONE” एकासाठी सर्वजण आणि सर्वांसाठी एकजण! या भावनेतून क्लबचे सर्व सदस्य एकत्रितपणे योगदान देत हा सेवायज्ञ गेल्या पाच वर्षांपासून अखंड सुरू ठेवत आहेत. 🦁 PST TEAM 2026–27 अध्यक्ष — ला. तुषार अढावे सेक्रेटरी — ला. मयूर जैन खजिनदार — ला. संदीप जैन प्रोजेक्ट चेअरमन — ला. केयूर शहा तसेच लायन्स क्लब धुळेचे सर्व सन्माननीय सभासद यांच्या सक्रिय सहभागातून हा प्रकल्प यशस्वीपणे सुरू आहे. WE SERVE 🦁 “प्रसिद्धीपेक्षा सेवा… शब्दांपेक्षा कृती… आणि प्रत्येक गरजूच्या चेहऱ्यावर समाधान!” ❤️ सेवा निरंतर… माणुसकी अविरत…!

Benefited People 70
Raised Of Amount 0
Donated Of Amount 0