• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

रंग दे तिरंगा

15 Aug 2026

धुळे : लायन्स क्लब धुळे तर्फे "रंग दे तिरंगा फेस्टिव्हल 2026" उत्साहात संपन्न ५००+ विद्यार्थ्यांचा सहभाग, १५००+ नागरिकांची उपस्थिती. धुळे, १५ ऑगस्ट २०२६ : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून लायन्स इंटरनॅशनल | डिस्ट्रिक्ट ३२३४ एच२ अंतर्गत लायन्स क्लब ऑफ धुळे तर्फे "RANG DE TIRANGA FESTIVAL 2026" या भव्य आंतर शालेय समूह गायन व नृत्य स्पर्धेचे आयोजन अध्यक्ष ला. तुषार आढावे यांच्या नेतृत्वात हिरे भावन, स्टेशन रोड, धुळे येथे करण्यात आले. देशभक्ती, संस्कृती आणि युवा शक्ती यांचा संगम असलेल्या या कार्यक्रमात धुळे शहरातील विविध शाळांमधील ५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी मंचावर देशभक्तीपर गीते व नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमासाठी १५०० पेक्षा जास्त नागरिक, पालक व शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाला मार्गदर्शन व प्रमुख उपस्थिती लाभली एम.जे.एफ. पी.डी.जी. लायन नितीनजी बंग, एम.जे.एफ.ला.हेमंतजी सोनार - रिजन चेअरपर्सन एम.जे.एफ. ला डॉ.प्रदीपजी गर्गे लिओ डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन एम.जे.एफ ला. श्रीहरी अहिरे झोन चेअरपर्सन सेक्रेटरी ला.मयूर जैन, खजिनदार ला.संदीप जैन, ला.अविनाश लोखंडे,ला.चेतन बरडिया, ला.अश्विन दाते, ला.डॉ वर्धमान जैन, ला.निलेश लोढा, ला.हर्षल अग्रवाल, ला.प्रदीप सोनवणे, ला.पुष्पक ओस्तवाल, ला.अजय कासोदेकर, ला.चारुल सुराणा, ला.कृष्णा मांडे, ला.गिरीश साळुंखेसर, ला.उमेश भांडारकरसर, ला.राज ओस्तवाल, ला.योगेश माळी, ला.सुनील कनुगो, ला.प्रतीक देसाई, ला.जयेश जैन, ला.ॲड नितीन गवळी लायन्स क्लब धुळेचे अध्यक्ष ला.तुषार आढावे यांनी सर्वांचे आभार मानताना सांगितले की, "रंग दे तिरंगा" हा केवळ स्पर्धा नसून तरुणांमध्ये देशप्रेम, आत्मविश्वास आणि सांस्कृतिक मूल्ये रुजवणारा एक सुंदर व्यासपीठ आहे. यापुढेही अशा सामाजिक व देशभक्तीपर उपक्रमांद्वारे समाजसेवेचा वसा आम्ही पुढे नेऊ." कार्यक्रमाच्या यशासाठी क्लबचे सर्व मेंबर्स, प्रकल्प अध्यक्ष व सर्व पदाधिकारी तसेच सभासदांनी विशेष मेहनत घेतली. जय हिंद ! जय लायन्स !

Benefited People 100
Raised Of Amount 0
Donated Of Amount 0