• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

राष्ट्रीय क्रीडा दिन निमित्त भव्य सायकल राईड

29 Aug 2026

🚴‍♂️🏆 राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त भव्य सायकल राईड 🏆🚴‍♀️ राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त २९ ऑगस्ट २०२६ रोजी अथर्व एंटरप्राइजेस (ट्रॅक अँड ट्रेल), धुळे, धुळे सायकलिस्ट फाउंडेशन आणि लायन्स क्लब धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सायकल राईडचे आयोजन करण्यात आले. 🚴‍♂️ ३० सायकलस्वारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सकाळी ६:०० वाजता राईडला सुरुवात केली. अथर्व एंटरप्राइजेसपासून सुरू झालेली ही राईड वाडीभोकर रोड – वाडीभोकर गाव – गोंदूर – निमडाळे – बापूंचा ढाबा – यु-टर्न - परतीचा प्रवास सेम - २५ की.मी. चा असा मार्गक्रमण करत सकाळी ८:०० वाजता अथर्व एंटरप्राइजेस येथे उत्साहात संपन्न झाली. 👕 सर्व सायकलस्वारांना अथर्व एंटरप्राइजेसतर्फे मोफत टी-शर्ट देण्यात आले, तर लायन्स क्लब धुळेतर्फे चहा व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. 🌹 या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीयुत पराग पाटील,श्रीयुत भैय्यासाहेब माळी, ला.केयूर शहा, ला.मयुर जैन व ला. वर्धमान जैन यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 💐 क्रीडा, आरोग्य आणि फिटनेसचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लायन्स क्लब धुळे | PST २०२६-२७ We Serve 🦁🚴‍♂️

Benefited People 30
Raised Of Amount 0
Donated Of Amount 0