• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

वृक्षारोपण

17 Aug 2026

श्रावणाच्या पहिल्या दिवशी हरित धुळे व लायन्स क्लब धुळे ऐतिहासिक संकल्प! श्रावण महिन्याच्या पवित्र पहिल्या दिवशी भक्ती, अध्यात्म आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगम साधत प्रभाग क्रमांक १ मधील सूर्यमुखी श्री हनुमान मंदिर परिसरातील टेकडीवर तब्बल २,५०० झाडांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे भविष्यातील वृक्षारोपणासाठी या परिसरात एकूण ३,५०० खड्डे तयार करण्यात आले असून, मोठ्या प्रमाणात वृक्षलागवडीच्या माध्यमातून या टेकडीला हिरवाईने नटविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. *नगरसेवक ललित माळी *यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर आयुक्तांनी महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा या उपक्रमासाठी उपलब्ध करून दिली. वृक्षारोपणासाठी आवश्यक मनुष्यबळ, नियोजन, स्वच्छता व्यवस्था आणि इतर प्रशासकीय बाबींमध्ये महानगरपालिकेच्या विविध विभागांनी सक्रिय सहभाग घेतला. या उपक्रमाच्या वेळी आमदार धर्मयोद्धा मा. श्री अनुप भैय्या अग्रवाल, आयुक्त श्री. नितीन कापडणीस, नगरसेवक ललित माळी ,सर्व स्वछता निरीक्षक, सफाई कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते परिसरातील नागरिक व इतर लायन्स सदस्यांनी आपला सहभाग नोंदविला. President Ln Tushar Adhave Secretary Ln Mayur Jain Lions Club Dhule 🙏🏻🙏🏻🙏🏻

Benefited People 10
Raised Of Amount 0
Donated Of Amount 0