--- *लायन्स क्लब नंदुरबार तर्फे डी.आर. हायस्कूल येथे मानसिक स्वास्थ्य, ताण-तणाव व नेत्र तपासणी शिबिर संपन्न* *नंदुरबार -* लायन्स क्लब, नंदुरबार आणि श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी मानसिक स्वास्थ्य, ताण-तणाव व्यवस्थापन व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक संजय सैंदाणे होते. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. दिनेश पाटील नेत्र शल्य चिकित्सक, लायन्स क्लब अध्यक्ष किरण पाटील ,लायन्स क्लबचे सचिव पंकज पाठक, खजिनदार डॉ. चेतन बच्छाव, उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक, पर्यवेक्षक राहुल पाटील, लायन श्रीराम दाऊतखाने, प्रोजेक्ट चेअरमन भूषण मराठे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख वक्ते डॉ. दिनेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यांवर होणारे दुष्परिणाम, डोळ्यांची काळजी कशी घ्यावी आणि दृष्टीचे रक्षण कसे करावे यावर सखोल मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक संजय सैंदाणे यांनी सांगितले की, नियमित व्यायाम, योगा आणि मेडिटेशन केल्यास शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहते आणि विद्यार्थ्यांना ताण-तणावावर मात करता येते असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ला.दिनेश वाडेकर यांनी केले, तर आभार ला.राहुल पाटील यांनी मानले. शिबिरात 70 विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
| Benefited People | 70 |
| Raised Of Amount | 1000 |
| Donated Of Amount | 1000 |