🌹 सेवा हीच खरी मानवता…! 🌹 लायन्स क्लब धुळे यांच्या वतीने हिरे मेडिकल कॉलेज व सिव्हिल हॉस्पिटल, धुळे येथे रुग्णांच्या नातेवाईकांना, मित्रांना तसेच गरजू व्यक्तींना दररोज सायंकाळी ७:०० वाजता गरमा-गरम खिचडीचे ७० पॅकेट्स प्रेमपूर्वक वितरीत करण्यात येतात. गेल्या ५ वर्षांपासून ही सेवाभावी उपक्रमाची अखंड परंपरा कोणत्याही खंडाविना निरंतर सुरू आहे. रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना अनेकदा मानसिक तणावासोबतच जेवणाचीही अडचण भासते. अशा कठीण प्रसंगी त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य आणण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे गरमा-गरम खिचडीचे हे सेवाकार्य. ही केवळ खिचडी वाटपाची सेवा नाही, तर माणुसकी, आपुलकी आणि संवेदनशीलतेचा जिवंत अनुभव आहे. गरजू व्यक्तीच्या हातात अन्नाचा एक पॅकेट देताना मिळणारे समाधान आणि त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारे हास्य हेच आमच्यासाठी या सेवाकार्याचे खरे फलित आहे. ५ वर्षे… दररोज ७० पॅकेट्स… आणि हजारो गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचलेली मायेची ऊब! ही सेवा भविष्यातही अशीच अखंड सुरू ठेवण्याचा लायन्स क्लब धुळेचा संकल्प आहे. 🙏 सेवा निरंतर… मानवता अखंड…! 🙏 🦁 Lions Club Dhule We Serve – आम्ही सेवेसाठी सदैव तत्पर! ला.तुषार अढावे - अध्यक्ष ला.मयूर जैन - सेक्रेटरी ला.संदिप जैन - खजिनदार
| Benefited People | 70 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 0 |