🦁 लायन खिचडी घर 🦁 दिनांक - २ ऑक्टोंबर २०२६ लायन्स क्लब धुळेचा सेवाभावी व कायमस्वरूपी प्रकल्प “अन्नदान हेच श्रेष्ठ दान… सेवेतून माणुसकी, माणुसकीतून समाधान!” लायन्स क्लब धुळेच्या वतीने राबविण्यात येणारा “लायन खिचडी घर” हा आमचा एक महत्त्वपूर्ण पर्मनंट सर्व्हिस प्रोजेक्ट असून, गेल्या पाच वर्षांपेक्षा अधिक काळापासून सिव्हिल हॉस्पिटल, साक्री रोड बायपास, धुळे येथे अविरतपणे सेवाकार्य सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत दररोज सायंकाळी ६:३० वाजता गरमागरम खिचडीचे सुमारे ७० ते ८० पॅकेट्स रुग्णांचे नातेवाईक, मित्रपरिवार तसेच ग्रामीण भागातून उपचारासाठी आलेल्या गरजू व्यक्तींना प्रेमपूर्वक वितरित केले जातात. रुग्णालयात आपल्या प्रियजनांच्या उपचारांसाठी थांबलेल्या नातेवाईकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा वेळी त्यांना अन्नाचा आधार मिळावा, त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलावे आणि संकटाच्या क्षणी त्यांना आपुलकीचा हात मिळावा, हीच या प्रकल्पामागील आमची सेवाभावी भावना आहे. प्रसिद्धीपेक्षा सेवा आणि दिखाव्यापेक्षा माणुसकी यांना प्राधान्य देत, समाजातील गरजू व्यक्तींची भूक भागविणे आणि त्यांच्या अडचणीच्या काळात मदतीचा हात पुढे करणे, हेच आमच्या क्लबचे प्रमुख ध्येय आहे. “WE SERVE” हे लायन्सचे ब्रीदवाक्य केवळ शब्दांत नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून जपण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. 🌟 पी.एस.टी. टीम २०२६–२७ - प्रोजेक्ट चेअरमन: MJF ला. केयूर शहा - अध्यक्ष: ला. तुषार अढावे - सेक्रेटरी: ला. मयूर जैन - खजिनदार: ला. संदीप जैन या सेवाकार्यात योगदान देणारे लायन्स क्लब धुळेचे सर्व सन्माननीय सभासद हे या उपक्रमाचे आधारस्तंभ आहेत. लायन खिचडी घर — भुकेल्याला अन्न, गरजूंना आधार आणि सेवेतून समाजाशी नाते जोडण्याचा एक प्रामाणिक संकल्प! ला. मयूर विजय जैन सेक्रेटरी (२०२६–२७) लायन्स क्लब धुळे 🦁
| Benefited People | 70 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 0 |