• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

लायन खिचडी घर

27 Sep 2026

🦁 लायन्स क्लब धुळे 🦁 दिनांक २७ सप्टेंबर २०२६ 🌟 लायन खिचडी घर — सेवेतून माणुसकीचा अनुभव 🌟 “We Serve” या लायन्सच्या सेवाभावी विचाराला प्रत्यक्ष कृतीत उतरवणारा लायन्स क्लब धुळेचा पर्मनंट प्रोजेक्ट — “लायन खिचडी घर” गेल्या पाच वर्षांपेक्षा अधिक काळापासून अविरतपणे सुरू आहे. सिव्हिल हॉस्पिटल, साक्री रोड बायपास, धुळे येथे दररोज सायंकाळी ६:३० वाजता गरमागरम खिचडीचे सुमारे ७० ते ८० पॅकेट्स रुग्णांच्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला तसेच ग्रामीण भागातून आलेल्या गरजू व्यक्तींना प्रेमपूर्वक वितरित केले जातात. या उपक्रमामागील आमचा मूळ उद्देश प्रसिद्धी नसून निःस्वार्थ सेवा हा आहे. रुग्णालयात आपल्या आप्तस्वकीयांच्या उपचारासाठी आलेल्या कुटुंबीयांना, तसेच दूरवरच्या ग्रामीण भागातून आलेल्या गरजू व्यक्तींना अडचणीच्या काळात अन्नाचा आधार आणि माणुसकीची ऊब मिळावी, हाच आमचा सेवाध्यास आहे. प्रसिद्धीपेक्षा सेवा, अपेक्षेपेक्षा माणुसकी आणि उपक्रमापेक्षा सेवाभाव मोठा — या विचारातून हा प्रकल्प सातत्याने पुढे जात आहे. या अन्नसेवेतून समाधान, आणि गरजूंच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हेच आमच्यासाठी या प्रकल्पाचे खरे यश आहे. 🦁 PST TEAM २०२६–२७ प्रो. चेअरमन — MJF ला. केयूर शहा अध्यक्ष — ला. तुषार अढावे सेक्रेटरी — ला. मयूर जैन खजिनदार — ला. संदीप जैन तसेच लायन्स क्लब धुळेचे सर्व सन्माननीय सभासद यांच्या सहकार्याने आणि सामूहिक सेवाभावनेतून हा पर्मनंट सेवा प्रकल्प अविरत सुरू आहे. ❤️ आमचे ध्येय एकच — “गरजूंच्या गरजेच्या वेळी मदतीचा हात, भुकेल्या व्यक्तीला अन्नाचा घास आणि प्रत्येक सेवेत माणुसकीचा स्पर्श!” 🦁 LIONS CLUB DHULE — WE SERVE 🦁 सेवा निरंतर • माणुसकी अविरत • अन्नदान अखंड

Benefited People 70
Raised Of Amount 0
Donated Of Amount 0