🦁 लायन खिचडी घर दि.६ सितंबर २०२६ “सेवेतून समाधान… माणुसकीतून आपलेपणा!” लायन्स क्लब धुळेचा “लायन खिचडी घर” हा केवळ अन्नवाटपाचा उपक्रम नसून, गेल्या ५ वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेला पर्मनंट सेवा प्रकल्प आहे. सिव्हिल हॉस्पिटल, साक्री रोड बायपास, धुळे येथे दररोज सायंकाळी ६:३० वाजता रुग्णांच्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला तसेच ग्रामीण भागातून उपचारासाठी आलेल्या गरजू व्यक्तींना गरमागरम खिचडीचे सुमारे ७० ते ८० पॅकेट्स प्रेमपूर्वक वितरित केले जातात. रुग्णालयात आपल्या प्रिय व्यक्तीच्या उपचारासाठी आलेल्या कुटुंबीयांसाठी प्रत्येक दिवस हा चिंतेचा आणि धावपळीचा असतो. अशा वेळी मिळणारा अन्नाचा एक गरम घास त्यांच्या मनाला आधार देतो. म्हणूनच आमच्यासाठी ही केवळ खिचडी वाटपाची सेवा नाही, तर माणुसकीची ऊब आणि आपुलकीचा आधार आहे. या प्रकल्पामागील आमचा मूळ उद्देश प्रसिद्धी नसून सेवा हा आहे. कोणतेही कौतुक किंवा अपेक्षा न ठेवता गरजूंच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहणे, हाच लायन्स क्लब धुळेचा सेवाध्यास आहे. 🤝 “ONE FOR ALL, ALL FOR ONE” एकासाठी सर्वजण आणि सर्वांसाठी एकजण! या विचारातून टीमवर्क, एकजूट आणि सेवाभाव जपत हा सेवायज्ञ गेल्या पाच वर्षांपासून अखंड सुरू आहे. 🦁 PST TEAM 2026–27 अध्यक्ष — ला. तुषार अढावे सेक्रेटरी — ला. मयूर जैन खजिनदार — ला. संदीप जैन प्रोजेक्ट चेअरमन — ला. केयूर शहा तसेच लायन्स क्लब धुळेचे सर्व सन्माननीय सभासद यांच्या सक्रिय सहकार्याने हा प्रकल्प यशस्वीपणे सुरू आहे. WE SERVE “प्रसिद्धीपेक्षा सेवा… आणि सेवेतून मिळणारे समाधान हेच आमचे खरे यश!” 🦁 लायन्स क्लब धुळे — सेवा निरंतर… माणुसकी अविरत!
| Benefited People | 70 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 0 |