• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

लायन खिचडी घर

31 Aug 2026

🌹 सेवा हीच खरी मानवता…! 🌹 लायन्स क्लब धुळे यांच्या वतीने हिरे मेडिकल कॉलेज व सिव्हिल हॉस्पिटल, धुळे येथे उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना व मित्रपरिवाराला गेल्या ५ वर्षांपासून निरंतरपणे गरमागरम खिचडीचे वितरण करण्यात येत आहे. दररोज सायंकाळी ७:०० वाजता तब्बल ७० पॅकेट गरमागरम खिचडी गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवली जाते. रुग्णालयात आपल्या आप्तस्वकीयांच्या उपचारासाठी आलेल्या अनेक नातेवाईकांना वेळेवर व पुरेसे जेवण मिळणे शक्य होत नाही. अशा वेळी त्यांना आपुलकीने, प्रेमाने आणि सेवाभावाने दिलेला गरमागरम अन्नाचा घास हा केवळ भूक भागवत नाही, तर त्यांच्या मनालाही आधार देतो. गेल्या पाच वर्षांपासून अखंड सुरू असलेला हा सेवायज्ञ म्हणजे लायन्स क्लब धुळेच्या “We Serve” या विचाराची जिवंत अनुभूती आहे. कोणताही गाजावाजा न करता, सातत्याने आणि निस्वार्थ भावनेने सुरू असलेली ही सेवा अनेक गरजूंसाठी दिलासा ठरत आहे. ७० पॅकेट दररोज × ३६५ दिवस × ५ वर्षे — या सेवेमागे असंख्य गरजूंच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि आशीर्वाद हीच लायन्स क्लब धुळेची खरी कमाई आहे. 🙏 सेवा अखंड सुरू राहो… माणुसकीचा हा सुगंध असाच दरवळत राहो…! 🙏 🦁 LIONS CLUB DHULE WE SERVE – आम्ही सेवेसाठी सदैव तत्पर! ला.तुषार अढावे - अध्यक्ष ला.मयूर जैन - सेक्रेटरी ला.संदीप जैन - खजिनदार लायन्स टीम (26-27)

Benefited People 70
Raised Of Amount 0
Donated Of Amount 0