🌟 दिनांक : २२ ऑक्टोबर २०२६, गुरुवार 🌟 🙏 लायन खिचडी घर – सेवेतून मानवतेचा संदेश! 🙏 लायन खिचडी घर हा लायन्स क्लब धुळे चा एक महत्त्वपूर्ण व कायमस्वरूपी सेवाप्रकल्प आहे. गेल्या ५ वर्षांहून अधिक काळापासून सिव्हिल हॉस्पिटल, साक्री रोड बायपास, धुळे येथे हा सेवायज्ञ अखंडपणे सुरू आहे. दररोज सायंकाळी ६:३० वाजता गरमागरम खिचडीची ७० ते ७५ पाकिटे रुग्णांच्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला तसेच ग्रामीण भागातून आलेल्या गरजू व्यक्तींना प्रेमपूर्वक वितरित केली जातात. प्रसिद्धी नव्हे, तर सेवा; दिखावा नव्हे, तर मानवता! हाच आमच्या उपक्रमाचा मूलमंत्र आहे. गरजूंच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलवणे आणि त्यांच्या कठीण प्रसंगी मदतीचा हात देणे, हेच आमचे खरे ध्येय आहे. 🌹 २०२६-२७ पी.एस.टी. टीम 🌹 🔹 प्रोजेक्ट चेअरमन – MJF ला. केयूर शहा 🔹 अध्यक्ष – ला. तुषार अढावे 🔹 सेक्रेटरी – ला. मयूर जैन 🔹 खजिनदार – ला. संदीप जैन तसेच लायन्स क्लब धुळेचे सर्व सन्माननीय सभासद या सेवाकार्यात मोलाचे योगदान देत आहेत. 💐 अन्नदान हेच श्रेष्ठ दान! सेवा हीच खरी ओळख! 💐 🦁 लायन्स क्लब धुळे – We Serve! 🦁 सेवेतून समाधान, मानवतेतून महानता!
| Benefited People | 75 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 0 |