🌿❤️ सेवा हीच खरी साधना…! ❤️🌿 लायन्स क्लब धुळे यांच्या वतीने हिरे मेडिकल कॉलेज व सिव्हिल हॉस्पिटल, धुळे येथे उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना व मित्रपरिवाराला दररोज सायंकाळी ७:०० वाजता गरमागरम खिचडीचे ७० पॅकेट्स प्रेमपूर्वक वितरीत करण्यात येतात. रुग्णालयात आपल्या प्रिय व्यक्तीच्या उपचारासाठी आलेल्या नातेवाईकांना अनेकदा वेळेवर आणि पुरेसे जेवण मिळणे कठीण होते. अशा वेळी त्यांची ही गरज ओळखून लायन्स क्लब धुळे ने सुरू केलेला हा अन्नसेवेचा उपक्रम आज एक सेवाभावी परंपरा बनला आहे. विशेष अभिमानाची बाब म्हणजे, हा सेवाकार्यक्रम मागील ५ वर्षांपासून अखंडपणे व निरंतर सुरू आहे. कोणताही गाजावाजा न करता, प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता केवळ मानवतेच्या भावनेतून ही सेवा दररोज केली जाते. ७० गरमागरम खिचडीची पाकिटे… दररोज… गेली ५ वर्षे! ही केवळ अन्नवाटपाची सेवा नाही, तर संकटाच्या काळात गरजूंच्या पाठीशी उभे राहण्याची माणुसकीची भावना आहे. या सेवेमागे योगदान देणाऱ्या सर्व लायन्स सदस्यांचे, देणगीदारांचे, कार्यकर्त्यांचे व सहकार्य करणाऱ्या प्रत्येक सेवाभावी व्यक्तीचे मनःपूर्वक आभार! 🙏🏻 सेवेचा हा अखंड प्रवाह असाच सुरू राहो… 🌟 “We Serve” – सेवा हाच आमचा संकल्प! 🌟 ला.मयूर जैन सेक्रेटरी लायन्स क्लब धुळे सेवा • समर्पण • मानवता
| Benefited People | 70 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 0 |