• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

लायन खिचडी घर

12 Oct 2026

🦁 लायन्स क्लब धुळे लायन खिचडी घर – सेवा, संवेदना आणि माणुसकीचा अखंड प्रवास 📅 दिनांक : १२ ऑक्टोंबर २०२६,सोमवार “लायन खिचडी घर” हा लायन्स क्लब धुळेचा पर्मनंट सेवा प्रकल्प असून, मागील पाच वर्षांहून अधिक काळापासून हा सेवायज्ञ धुळे येथील सिव्हिल हॉस्पिटल, साक्री रोड बायपास येथे निरंतर आणि अविरतपणे सुरू आहे. दररोज सायंकाळी ६:३० वाजता गरमागरम खिचडीचे जवळपास ७० ते ८० पॅकेट्स रुग्णांचे नातेवाईक, मित्रपरिवार तसेच ग्रामीण भागातून उपचारासाठी आलेल्या गरजू व्यक्तींना प्रेमपूर्वक वितरित केले जातात. या उपक्रमामागील आमचा उद्देश प्रसिद्धी मिळवणे नसून, गरजूंच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहणे हा आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना अनेकदा दिवसभर रुग्णालयात थांबावे लागते. अशा वेळी त्यांना मिळणारा गरम अन्नाचा घास हा केवळ भोजन नसून, माणुसकीचा आधार आणि आपुलकीची भावना आहे. “अन्नदान हेच श्रेष्ठ दान” या विचारातून सुरू असलेला हा प्रकल्प म्हणजे लायन्स क्लब धुळेच्या “WE SERVE” या मूलमंत्राचे जिवंत उदाहरण आहे. सेवा हीच आमची ओळख, माणुसकी हीच आमची प्रेरणा आणि गरजूंची मदत हाच आमचा ध्यास! या सेवाकार्यात २०२६-२७ PST टीम प्रो. चेअरमन MJF ला. केयूर शहा, अध्यक्ष ला. तुषार अढावे, सेक्रेटरी ला. मयूर जैन, खजिनदार ला. संदीप जैन. तसेच लायन्स क्लब धुळेचे सर्व सन्माननीय सभासद यांचे मोलाचे योगदान आहे. 🦁 LIONS CLUB DHULE WE SERVE – सेवा अखंडित, माणुसकी अविरत!

Benefited People 75
Raised Of Amount 0
Donated Of Amount 0