🦁 लायन्स क्लब धुळे 🦁 📅 दिनांक – २० ऑक्टोबर २०२६, मंगळवार 🌟 लायन खिचडी घर 🌟 कायमस्वरूपी सेवाप्रकल्प (Permanent Service Project) “सेवा हीच साधना, माणुसकी हाच धर्म आणि अन्नदान हेच श्रेष्ठ दान!” लायन्स क्लब धुळेचा ‘लायन खिचडी घर’ हा सेवाप्रकल्प गेल्या पाच वर्षांहून अधिक काळापासून सिव्हिल हॉस्पिटल, साक्री रोड बायपास, धुळे येथे अविरत सुरू आहे. दररोज सायंकाळी ६:३० वाजता गरमागरम खिचडीचे ७० ते ७५ पॅकेट्स रुग्णांचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामीण भागातून आलेल्या गरजू व्यक्तींना वितरित केले जातात. प्रसिद्धी नव्हे, तर निःस्वार्थ सेवा! गरजूंची भूक भागविणे, अडचणीच्या काळात आधार देणे आणि समाजात माणुसकीची भावना जपणे, हेच आमचे ध्येय आहे. 🦁 पी.एस.टी. टीम २०२६–२७ प्रोजेक्ट चेअरमन: MJF ला.केयूर शहा अध्यक्ष: ला.तुषार अढावे सेक्रेटरी: ला.मयूर जैन खजिनदार: ला.संदीप जैन लायन्स क्लब धुळेच्या सर्व सन्माननीय सभासदांचे मनःपूर्वक आभार! 💐 WE SERVE — सेवेतून समाधान, सेवेतून माणुसकी!
| Benefited People | 75 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 0 |