🦁 लायन खिचडी घर 🦁 ३ ऑक्टोंबर २०२६ लायन्स क्लब धुळेचा सेवाभावी व कायमस्वरूपी प्रकल्प “सेवा हीच साधना, माणुसकी हाच धर्म आणि अन्नदान हेच श्रेष्ठ दान!” लायन्स क्लब धुळेच्या वतीने राबविण्यात येणारा ‘लायन खिचडी घर’ हा आमच्या क्लबचा एक महत्त्वपूर्ण कायमस्वरूपी सेवाप्रकल्प (Permanent Service Project) आहे. गेल्या पाच वर्षांहून अधिक काळापासून सिव्हिल हॉस्पिटल, साक्री रोड बायपास, धुळे येथे हा सेवायज्ञ अविरतपणे सुरू आहे. दररोज सायंकाळी ६:३० वाजता गरमागरम खिचडीचे सुमारे ७० ते ८० पॅकेट्स रुग्णांचे नातेवाईक, मित्रपरिवार तसेच ग्रामीण भागातून उपचारासाठी आलेल्या गरजू व्यक्तींना प्रेमपूर्वक वितरित केले जातात. रुग्णालयात आपल्या प्रियजनांच्या उपचारांसाठी थांबलेल्या नातेवाईकांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. अशा वेळी त्यांना दोन घास अन्नाचे समाधान मिळावे, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे आणि संकटकाळात आपण त्यांच्या पाठीशी आहोत, याची जाणीव व्हावी, हीच या प्रकल्पामागील आमची खरी भावना आहे. प्रसिद्धीपेक्षा सेवा, कौतुकापेक्षा कर्तव्य आणि अपेक्षेपेक्षा माणुसकी यांना आम्ही अधिक महत्त्व देतो. गरजूंची भूक भागविणे, दुःखात आधार देणे आणि समाजाप्रती आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे, हेच आमच्या क्लबचे ध्येय आहे. 🦁 पी.एस.टी. टीम २०२६–२७ 🔹 प्रोजेक्ट चेअरमन: MJF ला. केयूर शहा 🔹 अध्यक्ष: ला. तुषार अढावे 🔹 सेक्रेटरी: ला. मयूर जैन 🔹 खजिनदार: ला. संदीप जैन या सेवाकार्यात योगदान देणाऱ्या लायन्स क्लब धुळेच्या सर्व सन्माननीय सभासदांचे मनःपूर्वक आभार! “लायन खिचडी घर — केवळ खिचडीचे वाटप नव्हे, तर भुकेल्या जीवांना मायेचा घास आणि माणुसकीचा आधार!” 🦁 WE SERVE — सेवेतून समाधान, सेवेतून माणुसकी!
| Benefited People | 70 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 0 |