• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

लायन खिचडी घर

24 Sep 2026

🦁 लायन खिचडी घर — पाच वर्षांची अविरत सेवायात्रा! दिनांक - २४ सप्टेंबर २०२६. लायन्स क्लब धुळेचा पर्मनंट सेवा प्रकल्प “लायन खिचडी घर” गेल्या पाच वर्षांपासून सिव्हिल हॉस्पिटल, साक्री रोड बायपास, धुळे येथे अविरतपणे सुरू आहे. दररोज सायंकाळी ६:३० वाजता सुमारे ७० ते ८० गरमागरम खिचडी पॅकेट्स रुग्णांचे नातेवाईक, मित्रपरिवार तसेच ग्रामीण भागातून आलेल्या गरजू व्यक्तींना प्रेमपूर्वक वितरित केले जातात. या उपक्रमाचा मुख्य उद्देश प्रसिद्धी मिळवणे नसून, निःस्वार्थ सेवेतून गरजू व्यक्तींना आधार देणे हा आहे. रुग्णालयात आपल्या प्रियजनांच्या उपचारांसाठी थांबलेल्या कुटुंबीयांना अन्नाचा आधार मिळावा, त्यांच्या अडचणीच्या काळात माणुसकीची ऊब आणि आपुलकीचा हात अनुभवता यावा, हीच आमची मनापासूनची भावना आहे. “We Serve” या लायन्सच्या ब्रीदवाक्याला कृतीत उतरवत, अन्नदान, सेवाभाव, सातत्य आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांच्या आधारावर हा प्रकल्प कार्यरत आहे. आमच्यासाठी गरजूंच्या चेहऱ्यावरचे समाधान हीच खरी प्रसिद्धी आणि सेवेतून मिळणारे समाधान हेच खरे यश आहे. 🌟 PST टीम २०२६–२७ 🔹 प्रो. चेअरमन: MJF ला. केयूर शहा 🔹 अध्यक्ष: ला. तुषार अढावे 🔹 सेक्रेटरी: ला. मयूर जैन 🔹 खजिनदार: ला. संदीप जैन लायन्स क्लब धुळेचे सर्व सन्माननीय सभासद यांच्या सहकार्याने आणि योगदानाने ही सेवायात्रा निरंतर सुरू आहे. आमचे ध्येय — “प्रसिद्धीपेक्षा सेवा, स्वार्थापेक्षा माणुसकी आणि सातत्यातून समाजकल्याण!” 🦁 Lions Club Dhule — We Serve 🦁

Benefited People 70
Raised Of Amount 0
Donated Of Amount 0