• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

Donation of White Sticks to Blinds

12 Jul 2026

लायन्स क्लब नांदेड प्राईडकडून तेजोमय प्रतिष्ठानला 100 व्हाईट स्टिक्सचे वितरण लायन्स क्लब नांदेड प्राईडच्या वतीने अंध बांधवांच्या सेवेसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या तेजोमय प्रतिष्ठान यांना 100 पांढऱ्या काठ्या (White Sticks) प्रदान करण्यात आल्या.तसेच अंध आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.दृष्टिहीन बांधवांच्या दैनंदिन जीवनात या काठ्यांचा मोठा उपयोग होणार असून, हा उपक्रम समाजसेवेतील एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला. या प्रसंगी नांदेडच्या महापौर सौ. सविताताई संतोष मुळे तसेच श्री. गोविंद नांदेडे, माजी शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जेष्ठ विधी तज्ज्ञ adv. शिवाजीराव हाके यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी लायन्स क्लब नांदेड प्राईडच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत अशा सेवा उपक्रमांचे स्वागत केले. या निमित्ताने तेजोमय प्रतिष्ठानच्या वतीने लायन्स क्लब नांदेड प्राईडचा यथोचित सत्कार करण्यात आला तसेच संस्थेने केलेल्या या समाजोपयोगी कार्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. भविष्यातही समाजातील गरजू घटकांसाठी अशाच सेवा उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. या वेळी Lions club Nanded Pride चे अभिजित रेणापूरकर, परेश मुनोत, मयूर अग्रवाल, विशाल कंदकुर्ते, हर्षद कोटगी, कृष्णा दमकोंडवार यांची उपस्तीथी होती.

Benefited People 100
Raised Of Amount 10000
Donated Of Amount 10000