• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

लायन खिचडी घर

01 Nov 2026

🦁 लायन्स क्लब धुळे 🦁 📅 दिनांक – १नोव्हेंबर २०२६, रविवार 🌟 लायन खिचडी घर 🌟 कायमस्वरूपी सेवाप्रकल्प “सेवा हीच साधना, माणुसकी हाच धर्म आणि अन्नदान हेच श्रेष्ठ दान!” लायन्स क्लब धुळेचा ‘लायन खिचडी घर’ हा कायमस्वरूपी सेवाप्रकल्प गेल्या पाच वर्षांहून अधिक काळापासून सिव्हिल हॉस्पिटल, साक्री रोड बायपास, धुळे येथे अविरतपणे सुरू आहे. दररोज सायंकाळी ६:३० वाजता गरमागरम खिचडीचे ७० ते ७५ पॅकेट्स रुग्णांचे नातेवाईक, मित्रपरिवार तसेच ग्रामीण भागातून आलेल्या गरजू व्यक्तींना प्रेमपूर्वक वितरित केले जातात. प्रसिद्धी नव्हे, तर निःस्वार्थ सेवा! गरजूंची भूक भागविणे, अडचणीच्या काळात त्यांना आधार देणे आणि समाजात माणुसकीची भावना जपणे, हाच आमच्या क्लबचा ध्यास आहे. 🦁 पी.एस.टी. टीम २०२६–२७ 🔹 प्रोजेक्ट चेअरमन: MJF ला. केयूर शहा 🔹 अध्यक्ष: ला. तुषार अढावे 🔹 सेक्रेटरी: ला. मयूर जैन 🔹 खजिनदार: ला. संदीप जैन या सेवाकार्यात योगदान देणाऱ्या लायन्स क्लब धुळेच्या सर्व सन्माननीय सभासदांचे मनःपूर्वक आभार! 💐 WE SERVE — सेवेतून समाधान, सेवेतून माणुसकी!

Benefited People 75
Raised Of Amount 0
Donated Of Amount 0