*लायन्स क्लब, शाहीर हरिभाऊ पाटील ट्रस्ट नंदुरबार, द स्पाईन फाउंडेशन मुंबई व जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने* *मोफत स्पाइन सर्जरी कॅम्प* *संपन्न* सदर स्पाईन सर्जरी कॅम्प हा शनिवार दिनांक 5 सप्टेंबर 2026 रोजी शासकीय रुग्णालयात पार पडला. यात जगप्रसिद्ध डॉ शेखर भोजराज सर ( लीलावती हॉस्पिटल, मुंबई )यांच्या नेतृत्वाखाली *11 मणक्यांच्या मोठ्या शस्त्रक्रिया* यशस्वी रित्या पार पडल्या. मुंबई व पुणे येथून डॉ शितल मोहिते, डॉ तुषार देवरे, डॉ मंदार बोर्डे, डॉ जयेश भानुशाली, डॉ सुरेश देशमुख, डॉ प्रणित पावसकर, डॉ विस्मय हरकारे, डॉ रवी त्रिवेदी यांचे सह श्री रोशन कुले श्री सुशांत रेमजे कु देवांगी जाधव ही स्पाईन फाउंडेशनची टीम सहभागी झाली. स्थानिक पातळीवर डॉ जोतिकुमार बागुल, डॉ संजय गावित, डॉ योगेंद्र नेहते, डॉ भारत कोवे, डॉ महेश मुथा या ॲार्थोपेडिक डिपार्टमेंट सह डॉ बोरसे सरांच्या नेतृत्वाखालील ॲनस्थेशिया टीमचे उत्तम सहकार्य मिळाले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी लायन्स क्लबला नेहमीप्रमाणे स्वातंत्र्य सैनिक शाहीर हरिभाऊ पाटील सेवाभावी संस्थेचेही सहकार्य लाभले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून निवृत्त प्राचार्य श्री बी एस पाटील सर व डॉ दीपक अंधारे यांनी शेखर भोजराज सरांचा सत्कार केला.लायन्स डिस्ट्रिक 3234 H 2 च्या VDG-2 एम जे एफ ला सौ सुप्रिया कोतवाल यांनी स्पाईन फाउंडेशन चे प्रमुख डॉ शेखर भोजराज (लीलावती हॉस्पिटल ) यांनी नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून करत असलेल्या मोफत शस्त्रक्रिया बद्दल कृतज्ञता म्हणून लायन्स क्लब ची पीन देऊन गौरव केला लायन अध्यक्ष श्री किरण पाटील, सचिव श्री पंकज पाठक, ट्रेझरर डॉ चेतन बच्छाव, झोन चेयरमन श्री शंकरभाई रंगलांनी, प्रोजेक्ट चेयरमन श्री सतीश चौधरी यांचे सह लायन्स सदस्यांनी व लायनबॅाय आशिष शिंपी यांनी शिबीराच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. *॥ WE SERVE॥*
| Benefited People | 13 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 0 |