• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

लायन खिचडी घर

30 Sep 2026

🦁 लायन खिचडी घर — सेवेतून समाधानाची अखंड वाटचाल 🦁 दिनांक - ३० सप्टेंबर २०२६ लायन्स क्लब धुळेचा “लायन खिचडी घर” हा एक पर्मनंट सेवा प्रकल्प असून, मागील पाच वर्षांपेक्षा अधिक काळापासून सिव्हिल हॉस्पिटल, साक्री रोड बायपास, धुळे येथे अखंडपणे सेवाकार्य सुरू आहे. दररोज सायंकाळी ६:३० वाजता गरमागरम खिचडीचे सुमारे ७० ते ८० पॅकेट्स रुग्णांचे नातेवाईक, मित्रपरिवार तसेच ग्रामीण भागातून उपचारासाठी आलेल्या गरजू व्यक्तींना प्रेमपूर्वक वाटप करण्यात येते. रुग्णालयात उपचार घेत असताना रुग्णाची काळजी घेणाऱ्या नातेवाईकांना अनेकदा वेळेवर भोजनाची अडचण निर्माण होते. अशा वेळी त्यांच्या गरजेच्या क्षणी अन्नदानाच्या माध्यमातून आधार देणे, हा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश आहे. “अन्नदान हेच श्रेष्ठ दान” या भावनेतून सुरू असलेली ही सेवा केवळ खिचडीचे पॅकेट वाटप नसून, गरजूंच्या चेहऱ्यावर समाधान आणि मनात आपुलकी निर्माण करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. आमचा मूळ उद्देश प्रसिद्धी नसून सेवा आहे. नावासाठी नव्हे, तर गरजवंतासाठी — हीच आमच्या क्लबची सेवा संस्कृती! या सेवाकार्यात २०२६-२७ पी.एस.टी. टीम तसेच लायन्स क्लब धुळेचे सर्व सन्माननीय सभासद सातत्याने योगदान देत आहेत. प्रो. चेअरमन — MJF ला. केयूर शहा अध्यक्ष — ला. तुषार अढावे सेक्रेटरी — ला. मयूर जैन खजिनदार — ला. संदीप जैन We Serve — सेवेतून समाधान, सेवेतून माणुसकी! ला. मयूर विजय जैन सेक्रेटरी (२०२६-२७) लायन्स क्लब धुळे

Benefited People 70
Raised Of Amount 0
Donated Of Amount 0