*लायन्स क्लब व फेमिना क्लब चा पद्ग्रहण समारंभ उत्साहात संपन्न* लायन्स क्लब व लायन्स फेमिना क्लब, नंदुरबार नूतन कार्यकारिणीचां 38 वा पदग्रहण समारंभ कन्यादान मंगल कार्यालयात उत्साहात संपन्न झाला. या शपथविधी कार्यक्रमासाठी मा. आमदार भैय्यासाहेब चंद्रकांतजी रघुवंशी, नगराध्यक्षा रत्नाताई रघुवंशी सुरत येथील डिस्ट्रिक्ट 323F2 चे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पी.एम.जे. एफ. ला. संजीव गांधी,डिस्ट्रिक 3234 H2 व्हि.डी.जी.2 एम जे एफ ला.सुप्रिया कोतवाल, रिजन चेअर पर्सन 2 एम जे एफ ला हेमंत सोनार, झोन चेअर पर्सन ला.शंकरभाई रंगलानी व ला.पिनल शहा आदींची प्रमुख उपस्थिती होती. मा.आमदार भैय्यासाहेब चंद्रकांतजी रघुवंशी यांनी आपल्या मनोगतात लायन्स क्लब करीत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमाबद्दल मनापासून कौतुक केले. त्यात प्रामुख्याने सिविल हॉस्पिटल व निराधार केंद्रातील अन्नदान सेवेचे विशेष कौतुक केले. व भविष्यात लायन्स क्लब ला सामाजिक कामासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच नूतन अध्यक्ष,सेक्रेटरी कार्यकारी टीमला शुभेच्छा दिल्या. लायन्स प्रथेनुसार मिटिंग कॉल टू ऑर्डर ,ध्वज वंदना घेण्यात आली.गत वर्षीचे अहवाल वाचन श्री दिनेश वाडेकर, सारिका जमादार यांनी केले तर मावळते अध्यक्ष डॉ.शिरीषकुमार शिंदे व रंजना बोरसे यांनी मनोगत व्यक्त केले. क्लब मध्ये येणाऱ्या नवीन सदस्यांचे इंडक्शन एम जे एफ ला हेमंत सोनार यांनी संपन्न केले.या नंतर ला संजीव गांधी यांनी अत्यंत आगळ्या पद्धतीने अध्यक्ष ला. किरण पाटील, सचिव ला.पंकज पाठक, ट्रेझरर ला.डॉ.चेतन बच्छाव,फेमिना अध्यक्षा ला.रागिणी पाटील,सचिव ला.चेतना गोस्वामी, ट्रेझरर ला.किरण गायकवाड व दोन्ही क्लबच्या नूतन कार्यकारणीचा शपथविधी संपन्न केला. व पुढील समाजकार्यासाठी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात श्री गणेश वंदना कु.परिणीता गोस्वामी हिने सादर केली तर पाहुण्यांचा परिचय ला राजेंद्र माहेश्वरी यांनी केला, तर ध्वज वंदना ला. दिनेश वाडेकर यांनी केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ला. अनिल पाटील,ला.दीपा वाडेकर, ला.चेतना बिरारीस यांनी केले.सचिव ला पंकज पाठक यांच्या ऋण निर्देशाने कार्यक्रमाची सांगता झाली.या प्रसंगी समाजातील अनेक प्रतिष्ठीत नागरिक, संस्था प्रतिनिधी व दोन्ही क्लब चे सदस्य सहपरिवार,पत्रकार बंधू आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व लायन्स सदस्यांचे सहकार्य लाभले.
| Benefited People | 100 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 0 |