*लायन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी तर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना खाऊ व बिस्किट वाटप* गंगाखेड: भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब गंगाखेड गोल्डसिटी च्या वतीने अहिल्यादेवी होळकर चौक परिसरात शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य खाऊ व बिस्किट वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. ध्वजारोहण सोहळ्यानंतर देशभक्तीच्या वातावरणात शहरातून निघालेल्या प्रभातफेरीतील शेकडो लहान विद्यार्थ्यांना लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी उत्साहाने खाऊच्या पुड्यांचे वाटप केले. लहान मुलांच्या हातातील तिरंगा आणि चेहऱ्यावरील आनंद या उपक्रमाचे मुख्य आकर्षण ठरला. या प्रसंगी लायन्स क्लबचे पदाधिकारी व स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहिल्यादेवी होळकर चौकातील मुख्य रस्त्यावर टेबल लावून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला. प्रमुख उपस्थिती: या उपक्रमास लायन्स क्लबचे पदाधिकारी, स्थानिक व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
| Benefited People | 2000 |
| Raised Of Amount | 5000 |
| Donated Of Amount | 3000 |