• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

लायन खिचडी घर

06 Oct 2026

🦁 लायन खिचडी घर 🦁 लायन्स क्लब धुळेचा पर्मनंट सर्व्हिस प्रोजेक्ट दिनांक : ६ ऑक्टोबर २०२६,मंगळवार “अन्नदान हेच श्रेष्ठ दान… सेवेतून समाधान आणि माणुसकीतून आपलेपणा!” लायन्स क्लब धुळेच्या वतीने राबविण्यात येणारा “लायन खिचडी घर” हा आमचा अत्यंत महत्त्वपूर्ण पर्मनंट सर्व्हिस प्रोजेक्ट आहे. गेल्या पाच वर्षांपेक्षा अधिक काळापासून सिव्हिल हॉस्पिटल, साक्री रोड बायपास, धुळे येथे हा सेवायज्ञ सातत्याने आणि अविरतपणे सुरू आहे. दररोज सायंकाळी ६:३० वाजता गरमागरम खिचडीचे सुमारे ७० ते ७५ पॅकेट्स रुग्णांना पाहण्यासाठी आलेले नातेवाईक, मित्रपरिवार तसेच ग्रामीण भागातून आलेल्या गरजू व्यक्तींना प्रेमपूर्वक वाटप केले जाते. रुग्णालयात आपल्या आप्तस्वकीयांच्या उपचारासाठी आलेल्या नातेवाईकांना अनेकदा मानसिक, आर्थिक आणि शारीरिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा वेळी त्यांच्या पाठीशी मायेचा घास आणि माणुसकीचा आधार म्हणून उभे राहणे, हाच या सेवाप्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. आमचा मूळ उद्देश प्रसिद्धी नसून सेवा आहे. कोणतेही श्रेय किंवा अपेक्षा न ठेवता गरजूंच्या मदतीसाठी पुढे येणे, त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणणे आणि समाजाप्रती असलेली आपली सेवेची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे, हेच लायन्स क्लब धुळेचे ध्येय आहे. 🦁 पी.एस.टी. टीम २०२६–२७ प्रो. चेअरमन : MJF ला.केयूर शहा अध्यक्ष : ला.तुषार अढावे सेक्रेटरी : ला.मयूर जैन खजिनदार : ला.संदीप जैन या सेवाकार्यात सातत्याने योगदान देणाऱ्या लायन्स क्लब धुळेच्या सर्व सन्माननीय सभासदांचे मनःपूर्वक आभार. “लायन खिचडी घर — भुकेल्याला अन्नाचा घास, गरजूला मदतीचा हात आणि समाजाला माणुसकीचा संदेश!” 🦁 WE SERVE — सेवा हाच संकल्प, माणुसकी हाच धर्म!

Benefited People 75
Raised Of Amount 0
Donated Of Amount 0