🌟 लायन खिचडी घर – सेवेतून समाधान, सेवेतून माणुसकी! 🌟 📅 दिनांक : २४ ऑक्टोबर २०२६, शनिवार लायन खिचडी घर हा लायन्स क्लब धुळेचा कायमस्वरूपी सेवाभावी प्रकल्प असून, गेल्या ५ वर्षांहून अधिक काळापासून सिव्हिल हॉस्पिटल, साक्री रोड बायपास, धुळे येथे अविरतपणे सुरू आहे. दररोज सायंकाळी ६:३० वाजता गरमागरम खिचडीचे ७० ते ७५ पाकिटे रुग्णांच्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला तसेच ग्रामीण भागातून आलेल्या गरजू व्यक्तींना प्रेमपूर्वक वितरित केली जातात. प्रसिद्धी नव्हे, तर सेवाभाव; अपेक्षा नव्हे, तर माणुसकी; आणि केवळ मदत नव्हे, तर गरजूंच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलवणे, हेच आमच्या प्रकल्पाचे खरे उद्दिष्ट आहे. या सेवाकार्यात २०२६-२७ ची पी.एस.टी. टीम, प्रोजेक्ट चेअरमन MJF ला. केयूर शहा, अध्यक्ष ला. तुषार अढावे, सेक्रेटरी ला. मयूर जैन, खजिनदार ला. संदीप जैन तसेच लायन्स क्लब धुळेचे सर्व सन्माननीय सभासद यांचे मोलाचे योगदान आहे. 🙏 अन्नदान हेच श्रेष्ठ दान! ❤️ आपले ब्रीदवाक्य – WE SERVE! 🌹 लायन्स क्लब धुळे – सेवेतून माणुसकी जपणारा परिवार! 🌹
| Benefited People | 75 |
| Raised Of Amount | 0 |
| Donated Of Amount | 0 |