• District 3234H2

    One for All All for One

Club Social Activities

लायन खिचडी घर

26 Sep 2026

🦁 लायन खिचडी घर Lions Club Dhule | Permanent Service Project दिनांक - २६/०९/२०२६ “We Serve” या लायन्सच्या ब्रीदवाक्याला प्रत्यक्ष कृतीत उतरवणारा लायन्स क्लब धुळेचा पर्मनंट प्रोजेक्ट — “लायन खिचडी घर” गेल्या पाच वर्षांपेक्षा अधिक काळापासून अविरतपणे सेवाकार्य करत आहे. सिव्हिल हॉस्पिटल, साक्री रोड बायपास, धुळे येथे दररोज सायंकाळी ६:३० वाजता गरमागरम, पौष्टिक खिचडीचे जवळपास ७० ते ८० पॅकेट्स रुग्णांच्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला तसेच ग्रामीण भागातून उपचारासाठी आलेल्या गरजू व्यक्तींना प्रेमपूर्वक वितरित केले जातात. रुग्णालयात आपल्या प्रिय व्यक्तीच्या उपचारासाठी आलेल्या कुटुंबीयांना अनेकदा मानसिक ताणासोबतच अन्नाचीही गरज भासते. अशा वेळी त्यांच्यापर्यंत अन्न, आपुलकी आणि माणुसकीचा आधार पोहोचवणे, हाच या प्रकल्पामागील मुख्य उद्देश आहे. या सेवाकार्यामागे प्रसिद्धी मिळवणे हा हेतू नाही; तर निःस्वार्थ सेवा, सामाजिक बांधिलकी आणि गरजूंच्या मदतीची भावना हेच आमचे खरे ध्येय आहे. “प्रसिद्धीपेक्षा सेवा, दिखाव्यापेक्षा माणुसकी आणि अपेक्षेपेक्षा सामाजिक बांधिलकी” या विचाराने हा प्रकल्प सातत्याने सुरू आहे. 🦁 PST TEAM 2026–27 प्रो. चेअरमन: MJF ला. केयूर शहा अध्यक्ष: ला. तुषार अढावे सेक्रेटरी: ला. मयूर जैन खजिनदार: ला. संदीप जैन या सेवाकार्याला सातत्य, सहकार्य आणि सामूहिक शक्ती देणारे लायन्स क्लब धुळेचे सर्व सन्माननीय सभासद हे या प्रकल्पाचे आधारस्तंभ आहेत. आमचे ध्येय “गरजूंच्या गरजेच्या वेळी मदतीचा हात, भुकेल्यासाठी अन्नाचा घास आणि प्रत्येक सेवेतून माणुसकीचा स्पर्श!” 🦁 LIONS CLUB DHULE — WE SERVE 🦁 अन्नदानातून समाधान • सेवेतून माणुसकी • सातत्यातून विश्वास

Benefited People 70
Raised Of Amount 0
Donated Of Amount 0